एक उसासा

एक उसासा .......

श्वासा पलिकडचा ।

एक दृष्टी ......

नजरे पलिकडची ।

एक स्पर्श .......

जाणिवे पलिकडचा ।

एक शब्द ......

संवादा पलिकडचा ।

एक भेट... .

मिलना पलिकडची ।

एक आस .........

ध्यासा पलिकडची ।