प्रिय गांधीजी,
तुमचा देश- वेश शोधण्यासाठी
निघालो काना-कोपऱ्यात, देशाच्या,
तुमच्या हाका- 'खेड्यात चलण्याच्या'
ऐकण्या निघालो, वाटा देशाच्या ,
प्रिय गांधीजी,
तुमची टोपी, दिसली- कुठे कुठे,
कुणा - कुणाच्या टाळक्यावर,
पण, तीच्याखाली नुसतीच -
टाळकी दिसली
प्रिय गांधीजी,
तुमचा सत्याग्रह दिसला,
आग्रहासारखा रस्त्या-रस्त्यावर,
सत्यापासून दूर दूर
पूर्वग्रहांच्या आधारावर .
प्रिय गांधीजी,
अहींसा सुद्धा कुठेच नाही सापडली,
डांगोरा, मात्र खूप दिसला,
तुमच्या काठीच्या आधाराने उभा,
गांधीवाद निराशेने फसला.