दंतकथा
किती हे,
कोडग्यांचे राष्ट्र
अहिंसा तर सोडाच
होउनी प्रसंगी हिंसक
मगतो जेव्हा दाद आम्ही
तेव्हाही उपेक्षेचाच टिळा
मिरवतो भाळी आम्ही
नोटांवरती
निळ्या, पिवळ्या, लाल
पाहतो जेव्हा
तुमची हसरी मुद्रा अन्
उपेक्षित तुमचा माथा
तेव्हा बापु,
वाटू लागता आम्हा
तुम्ही तर एक
दंतकथा...................!!!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.