झड श्रावणाची

झड श्रावणाची

अचानक श्रावणाची झड ती आली
अंग अंग भिजवून गेली

ओल्या केसातून बट ही ओघळली
चिटकून बसली गोऱ्या गाली

मोहक हालचाल सुखावून गेली
नकळत डोळे विस्फारून गेली

कवेत घेता काया ही थरथरली
चित्तवृत्ती मोहरून गेली

त्रेधातिरपीट उडवून गेली
यौवनास माझ्या खिजवून गेली

जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली
श्रावणात होते पापणी ही ओली

राजेंद्र देवी