यशवंती

          यशवंती

किती धन्य धन्य
वाटले तेव्हा महिलांना
मिळाले जेव्हा त्यांना
सत्तेत आरक्षण
पुरुषांची मात्र
बसली पाचावर धारण
महिला सरसावल्या
निवडणूकीत उतरल्या
बसल्या जाउन त्या
सत्तेच्या खुर्चीत
कारभाराच्या चाव्या मात्र
पुरुषांच्या मुठीत
कळेना
हे काय गौडबंगाल ?
पुरुष ईरसाल कि
महिला हळवा वाल ?
व्हायचे होते जिला
सागरावर आरुढ झालेली
जलवंती
झाली ती मात्र
पुरुषांच्या ईशाऱ्यावर
चालणारी
तानाजीची ' पाळीव '
यशवंती.............!!!
                                          -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                            मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.