वाटले की, पाय मजला नेत होते....

विसर्ग उमटवण्यासाठी 'कॅपिटल एच' चा वापर करावा.
उदा.
'स्वतःचा' असे लिहायचे असेल तर svatHchaa असे लिहावे म्हणजे 'स्वतःचा' असे उमटेल. (
'स्वत:चा' असे नव्हे)
कोलन हे अक्षर नव्हे. ते विरामचिन्ह आहे. विसर्ग हे देवनागरी अक्षर आहे. त्याच्या डोक्यावर रेघ आहे.

कृपया असे बदल करण्याआधी लेखन सुपूर्त करू नये.

अशी सूचना तुम्हाला ह्यापूर्वी दिलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.
गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
*******************************************
वाटले की, पाय मजला नेत होते....
चालताना साथ रस्ते देत होते!

गुणगुणू मी लागलो अन् गीत झाले;
कोण जाणे, कोण स्फूर्ती देत होते!

त्या दिशेने पौर्णिमा गेली असावी....
जागजागी चांदणे वाटेत होते!

अस्थिकलशाची निघाली धिंड माझ्या....
काय माझ्या नेमके राखेत होते?

बंद झाले दार एकेका घराचे;
रंग कोणाचे तुझ्या गझलेत होते?

झेप गरुडाची तिथे नव्हती कुणाची;
लोक मुंग्यांसारखे रांगेत होते!

कैकदा ठेचाळताना वाचलो मी,
दीपस्तंभांचे अघोरी बेत होते!

ह्याचसाठी काय झाला बोलबाला?
मी पिढ्यांचे मोडले संकेत होते!

ही कशी आली दिशांची झुंड दारी?
काय ऐसे माझिया हाकेत होते?

पाहिले मी कोरडे डोळे स्मशानी;
लोचनी माझ्याच अश्रू येत होते!

-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१