सखया, कृष्णा , मोहना ...

सखया, कृष्णा , मोहना ...

येशील नारे धावोनिया

माझीया शेवटल्या क्षणा....

बाप-मायने सांडियले ,

बंधू-भगिनीही भांडले ,

तुझ्या शिवाय येईना,

कोणाही माझी करुणा

तुची माझा राखण्या.

सखया, कृष्णा , मोहना ...॥ १॥

अति विश्वासोनी तुजवरी

घेतोय घाव आजवरी ,

सदैव तुची अंतरी ,

शेवटही गोड करी ,

पुरवी हीच कामना ,

सखया, कृष्णा , मोहना ...॥ २॥

जायाचे दुःख नलगावे ,

अंती आनंदयात्री व्हावे,

शमवी साऱ्या वासना,

सोडवी सारी बंधना ,

सखया, कृष्णा , मोहना ...॥ ३ ॥

तुझ्या सवेची निर्गता ,

सगुण वा निर्गुणा ,

देह ना ठेवी त्याविना ,

अखेरीचीही प्रार्थना  ,

सखया, कृष्णा , मोहना ...॥ ४ ॥

येशील नारे धावोनिया

माझीया शेवटल्या क्षणा....