का मला पाहून आता लागली लाजायला?

आदरणीय कविवर्य श्री. संदीप गुप्ते यांच्या एका गझलेचा भावानुवाद देत आहे! भावानुवाद प्रेरणा ही श्री. राज पठाण यांनी दिली!
मूळ संदीप गुप्तेंची गझल आधी देत आहे व तिचा शेरनिहाय भावानुवाद खाली देत आहे! कवितेचा अनुवाद करणे हे तसे जडच असते! पण मूळ गझलेतील सौंदर्यच इतके लोभस होते, की, कुणालही तिचा अनुवाद करावा असे वाटेल! पहा आमचा प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे ते ! आपली मते जरूर जरूर कळवा!
मूळ संदीप गुप्तेंची गझल खालील प्रमाणे..............
अचानक मुझसे शरमाने लगी है
खुशी गैरो सी पेश आने लगी है ' ....
(संपादित. मनोगतावर लिहिताना इतरभाषिक मजकूर कुठल्याही कारणाने १०% च्या वर जाणार नाही ह्याची कृपया खबरदारी घ्यावी.
योग्य वाटत असल्यास असा इतरभाषिक मजकूर जालावर इतरत्र ठेवून त्याचा दुवा आपल्या लेखनात द्यावा. कळावे. : प्रशासक)

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा

का मला पाहून आता लागली लाजायला?
ही सुखे परक्याप्रमाणे लागली वागायला!

फूल स्वप्नांचे जुन्या फुलले परंतू तोच हे.....
कोणते काटे नवे मज लागले बोचायला?

ही नदी माझ्या तृषेची संथ होती आजवर.....
का समुद्राच्या दिशेने लागली झेपायला?

मी न एकाकी अता या माझिया खोलीमधे!
झोत वाऱ्याचा पहा येतो मला भेटायला!!

जिंदगीचा कैफ आता केवढा चढतो मला!
हे उभे आयुष्य माझे लागले झिंगायला!!

संकटे येतात, येवोही हजारो जीवनी!
का अठ्या माझ्या कपाळी लागल्या उमटायला?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१