बाप्पा , बाप्पा , मोरया ...

बाप्पा , बाप्पा , मोरया ...

सुख, समृधी घेऊन या .

आरतीच्या घंटानादात

आई मागते कांदा उतरो,

बाबा म्हणतात पेट्रोल घसरो

डॉलरला द्या  अलगत धक्का

रुपायालाही  जरा सावरा ॥१॥

बाप्पा , बाप्पा , मोरया ...

सुख, समृधी घेऊन या

बाप्पा म्हणतो , अरे हे काय

मागून मागून , मागता काय ?

मी तर आले द्याया न्याय.

देशीलाही तु मोठे काही

झोळी आमची फाटकी पाही

घेण्याचीही ताकत आता

आमुच्यात का राहीली नाही? ॥२॥

 बाप्पा , बाप्पा , मोरया ...

सुख, समृधी घेऊन या.

मोठ्या मागण्या नंतर पाहू

आल्या दिसाची नड भागवू

जगवशील जिव आज तरी

उद्याची स्वप्न नवीन पाहू ॥३॥

बाप्पा , बाप्पा , मोरया ...

सुख, समृधी घेऊन या .