कातर सांजवेळ
सळसळीने पानांच्या
मन का होते आतुर
कातर या सांजवेळी
मनास का हुरहुर
उगाच सले उरीही
दुरची चंद्रकोर ती
अशा निवांत समयी
येईल कोण सांगाती
झुळकता मंद वारा
उठवी मनी काहूर
कातर या सांजवेळी....
दुरच्या पदरवाचा
नजर का वेध घेते
पायवाट थांबलेली
मन का उदास होते
निरव या शांतीनेही
का भरून येतो उर
कातर या सांजवेळी.......
सुने सुने मन माझे
कशास हे असावाले
अनामिकाच्या ओढीने
का उगाच बावरले
ओथंबल्या उरी दाटे
गत आठवांचा पुर
कातर या सांजवेळी
मनास का हुरहुर.....!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.