मोडू म्हणूनिया कधी

मोडू म्हणूनिया कधी
नाते नच मोडते रे
सोडू म्हणुनिया कधी
प्रेम नच तुटते रे

सुख दु:खी बांधलेल्या
गाठी जन्मा सवे येती
नाही म्हणूनि का कधी
अव्हेरते बीजा माती

लक्ष लक्ष योजनेही
पक्षी दिगंतरा जाती
साद घालताच कुणी
पुन्हा परतुनी येती

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १