क्षण दुखरे - हसरे
क्षण जे निसटून गेले
फिरून ना पुन्हा यायचे
गाभाऱ्यातून मनाच्या मात्र
हरवून ना जायचे
किनार दुःखाची, झालर सुखाची
काळीज हे मढवलेले
आशेच्या जिवंत रेट्याने
जीवन हे घाटावरती चढवलेले
एकांती धांडोळा घेताना
गत सोनेरी क्षणांनी हरखायचे
दुखऱ्या - खुपऱ्या क्षणांनी मात्र
अलगद डोळ्यातूनी पाझरायचे
हुरहुरत, काहीसे चुटपुटत
राईतून त्या बाहेर यायचे
आजची वाट चालताना
पुन्हा दुखरे - हसरे क्षण साठवायचे......!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.