पाणकळा
गेला सारा पावसाळा
नाही पडलं टिपूस
आलं थोडं-बहू पीक
त्याला घामाचा पावूस
परतीच्या पावसानं
असं घातलं थैमान
घास सानूला तोंडचा
नेला त्यानं हिरावून
आधी अंगार कोरडा
ओला शेवटी दुष्काळ
कुणब्याच्या रे डोळ्याला
कधी दिसल सुकाळ
आसमानी सुलतानी
घालती गळ्यात गळा
कुणब्याच्या डोळ्यामधी
सदाचाच पाणकळा
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.