तो शब्द मूक करण्यामागचा विचार कोणता?

नाना पाटेकर, राजकुमार अभिनित तिरंगा हा चित्रपट १९९३ मध्ये आलेला होता. झी सिनेमा या वाहिनीवर तो बरेचदा दाखविला जातो. परवाच तो अजून एकदा  पाहण्यात आला. या चित्रपटात अखेरीला एक दृष्य आहे, ज्यात राजकुमार एका मंत्र्याला ठार करतो. ठार करण्यापूर्वी राजकुमारच्या तोंडी खालील आशयाचा संवाद आहे.

पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या
गृहमंत्र्या, कुठे पळतोस? भोग कर्माची फळे...

वरील संवादातील लाल रंगातील शब्द मूक केलेला आहे. ऐकू येताना असे ऐकू येते -

पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या       मंत्र्या, कुठे पळतोस? भोग कर्माची फळे...

 राजकुमारच्या तोंडाची हालचाल नीट पाहिल्यास चाणाक्ष प्रेक्षकांच्या ध्यानात येते की, तो शब्द गृह असा आहे. अलीकडच्या वाहिन्यांच्या धोरणानुसार,  चित्रपट दाखविताना व्यक्तिरेखांच्या तोंडच्या  शिव्या मूक केलेल्या दिसतात. ' मूक करण्यास योग्य ' शब्दांच्या यादीत गृह शब्दाची भर पडलेली दिसते. 
प्रश्नः
१. चित्रपट जेव्हा १९९३  मध्ये  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा गृह शब्द प्रेक्षकांना ऐकू गेला.  सरकारला  अठरा-वीस वर्षांनी आक्षेपार्ह  काय दिसले?
2. गृह शब्दाच्या जागी, अर्थ वा परराष्ट्र वा तत्सम शब्द असते (म्हणजेच ती व्यक्तिरेखा अर्थमत्र्याची वा परराष्ट्रमंत्र्याची असती तरीही)तरीही ते मूक केले गेले असते, असे मानण्यास जागा आहे. प्रत्यक्षात जरी ही खाती सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्या मनात पंतप्रधान बनण्याची अभिलाषा असली किंवा नसली तरी तसे चित्रपटांतून कदापिही दाखविले जाऊ नये, असा धोरणात्मक बदल  केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने, सरकारने वा यासंदर्भातील इतर मार्गदर्शक मंडळाने केलेला आहे का ?

3. चाणाक्ष प्रेक्षकांना तो शब्द कोणता आहे, हे ओळखता येते. मग, असे वाष्कळ धोरण राबविण्याची गरज आहे का?