ऐकत जावे तुला सारखे

असे वाटते ऐकत जावे तुला सारखे
गीत तुझे झंकारत आहे मना सारखे

तबला,पेटी,वीणा आणि दुःख मनाचे,
जीवन माझे उरले आता गीता सारखे

काट्यांची चादर विषारी पायवाट पण,
जितके जगलो तितके जगलो फुला सारखे

मोठा झालो दुनीया आता नको वाटते,
आईने मज पुन्हा धरावे "मुला" सारखे
                                      -स्नेहदर्शन