समुद्राच्या हायकू

१. समुद्र निश्चल

वाऱ्याची झुळूक

कलाकुसर.

२. मासोळी उडते

पाण्यात पडते

पक्षी न होता.

३. निळाशार समुद्र

स्फटिकासारखा

तळात गाळ.

४. समुद्रात होडी

होडीला ओढ

साहसाची.

५. वादळात होडी

होडीला ओढ

किनाऱ्याची.

६. नारळी पौर्णिमा

समुद्र शांत

एका नारळाने.

७. ओल्या पाऊलखुणा

समुद्र पुसतो

मागमूस नाही.