ती रात्र...


ही गझल 'मायबोली.कॉम'च्या 'हितगुज २०१३' ह्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाली आहे.

ती रात्र...

ती रात्र साधे ओळखीचे हासली...
माझीच स्वप्ने मग चुकीचे वागली

सांगा तिला आता पुन्हा भेटू नको
माझी नजर नाही अताशा चांगली

काही तरी कानावरी गेले तिच्या
राखून अंतर चालते ती सावली

झाले कमी ना सोहळे गावातले
आमंत्रणे पण यायची ती थांबली

काठावरी फसवीच आहे शांतता
यमुना मनाची कालियाने व्यापली


------------------------------------------- जयन्ता५२