" नेते जाणिले कुणी"
नेते जाणिले कुणी? हो नेते जाणिले कुणी ॥ध्रु॥
सर्वस्तरावर करूनी वल्गना'; शेखी मिरवती जनी।हो। नेते.... ॥.ध्रु॥
काम कोणते जरी असंभव ।पैसे घेऊन करिती संभव॥
नीतिमत्ता यांना न उरली, जगती साव होऊनी।हो। नेते... ॥. १॥ध्रु॥
आपत्ती ही कुठली येता ।जमवी वर्गणी सारी जनता॥
पैसा सारा घेऊनी हाती, थोडा वाटती जनी ।हो।नेते..... ॥२॥ध॥
गांवगुंड हे नेते उद्याचे ।करी वाटोळे या देशाचे ॥
वाचविण्या या भूमातेला, सज्जन द्या निवडूनी।हो।नेते....॥३॥ ॥ध्रु॥
अनंत खोंडे'
५।१२।२०१३.