परी

परी

दूर एक तारा क्षितीजावरी
तेथे राहते माझ्या स्वप्नातली परी

घेत गिरकी फुलपाखरी
घेऊन येई चांदणे भुवरी

असे जादूची छडी तिच्या हाती
गेली विसरून माझ्या घरी

लपवून ठेवली मी ती ऐसी
माझ्याच घरी आता राहते परी

राजेंद्र देवी