चंचला नार, अति हळुवार

चंचला नार, अति हळुवार

घेउनी गिरकी , दावी कमान

उभार बांधा ,सुबकसा छान ॥१॥

 भुवईच्या कमानी, नजरेचे बाण

या मदन तीरांनी अचूक छेदुनी ,

कितीनी गमावलं प्राण ॥२॥

थिरकती, फिरकती चांदणं ,जणू पायातील चाळ 

दाटली कंचुकी , अत्तराच्या कुपी , मृगापरी धुंद

दरवळला मोगरा चहूकडे , तयाचा मदन गंध बेधुंद ॥३॥

गंधात भिजली सांज, नका ठेवू भीड तुम्ही आज

स्वप्नात यावं सख्या , मिलनाचा चढू दे साज

सांगीन तुम्हा , मनातली माझ्या सारी राजं ॥४॥