किती काही

तुझ्या एका भेटीत घडतं किती काही..
ऊर्मींचे उत्सव,
जाणिवांच्या जत्रा,
आकांक्षांची आरास,
स्पर्शांचे सोहळे,
मनिषांचे मेळे...

तुझ्या एका भेटीनंतरही होतच राहतात
अतृप्तींची आंदोलने,
(नव्या))मागण्यांचे मोर्चे,
'नकारा'च्या निषेधसभा,
हुरहुरींचे हैदोस.....

तुझ्या एका भेटीत घडतं किती काही
आणि उरतंही किती काही...

---------- जयन्ता५२