साथ...

साथ...

आभाळ माझे उसवलेले
दे तुझा एक टाका
गर्तेत पाय रोवलेले
दे हात तू जरासा

दाह हा देहाचा
वणवा अंतरीचा
तुझ्या एका फुंकरीने
उतरेल ज्वर माझा

भरकटलेली नाव माझी
शीड फाटलेले
वल्हवीन मी जोमाने
दे पदर तू जरासा

राजेंद्र देवी