तूच तू माझे जीवन....
तुझे डोळे की नशा ही
हे काजळ की निशा ही
मी वेडावून जातो
या लाटेत वाहातो
तूच तू माझे जीवन....
कधी चंचल मृगनयना तू
कधी भावुक मोर पिसा
तू बहरत्या कळीची
तू गंधित वाऱ्याची
तूच तू माझे जीवन....
कधी लटका राग थोडा
कधी हसरा मंद वारा
तू रिमझिम रंगांची
तू रेशीम किरणांची
तूच तू माझे जीवन....
तुझ्या श्वासांची मखमल
किती नाजुकशी कोमल..
तुझा स्पर्श... ती धुंदी
मी बेहोष... बंदी
तूच तू माझे जीवन....
माझ्या नजरेने पाहा तू
माझ्या डोळ्यात राहा तू
तू आशा स्वप्नांची
तू राधा या कृष्णाची...
तूच तू माझे जीवन ~~~~
मनिष...