"मोकळा श्वास"

इकडे कोंडी तिकडे कोंडी,
सर्वीकडे कोंडी कोंडी।
मोकळाश्वास घेण्यासाठी,
पुणेकर हा वाट धुंडी॥॥

वाढला चोहिकडे वाहनांचा पसारा।
प्रदुषणाने भरला असमंत सारा॥
पावला पावलावर होती,
अपघात घडी घडी॥१॥

ज्याला त्याला आहे पुढे जाण्याची घाई।
थोडे थांबण्यासाठी कोणा वेळ नाही॥
पादचाऱ्यास न दिसे वाट,
ज्याण्या पैलथडी ॥२॥

राने वने, टेकड्या आज नष्ट झाल्या।
भयान स्मशानासम त्या भासू लागल्या॥
उभी ठाकली तेथे आज,
इमले बडी बडी॥३॥

नाही गेला वेळ करा अजून विचार।
लावा तुम्ही झाडी तुमचे सभोवार॥
तरच घेता येईल तुम्हा,
मोकळा श्वास हरघडी॥४॥