हे स्विकारू....

गझल क्रमांक ७
वृत्त: पुष्प
लगावली: गालगागा
****************************************************

हे स्विकारू....
की, झुगारू?

मन म्हणे ‘हो’.....
का नकारू?

रंग कुठला,
मी उतारू?

सांग कैसे
मी चितारू?

बाग दोघे...
ये, फुलारू!

घे सुकाणू.....
नाव तारू!

चाल कर तू....
धूळ चारू!

जे न कळते,
ते विचारू!

देव येतो....
चल, पुकारू!

कौल आला....
चल, रुकारू!

सूर्य नाही....
ये, दवारू!

हात जोडू,
की, उगारू?

सापळे हे....
मोह सारू!

धीर होतो.....
भीड मारू!

वाट दाखव.....
मी चुकारू!

जग बघ्यांचे....
ये, इशारू!

ही न झाडे......
हे लुटारू!

सोड गाडी....
तू उतारू!

कर्ज कैसे,
मी उतारू?

कोकणस्थी....
नेत्र  घारू!

चक्क म्हणती.....
लाच चारू!

त्या स्मृतींनी....
ये, शहारू!

मंच सारा....
चल थरारू!

ती भिडू, मग....
आज हारू!

भूक आहे....
पण डकारू!

............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१