घर उन्हात....

घर उन्हात....

बांधले घर मी माझे उन्हात
कोमेजून गेलो क्षणात
देशील का तुझ्या प्रेमाची सावली
करतोय याचना पावलो पावली

ना दिवस कळे ना रात्र
चालत राहतो मी अहोरात्र
थकली जरी गात्रंन गात्र
ध्यास तुझा आहे अहोरात्र

वरतुनी आकाश कोसळे
डोळ्यातून अश्रू गळे
हुडहुडलेल्या मनाला
तुझ्या आठवणीची उब मिळे

राजेंद्र देवी