चिंबोरी च्या कालवणाचा, रंग कसा लाल बाई.. 

( चाल - निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई )

चिंबोरी च्या कालवणाचा,
रंग कसा लाल बाई.. 
आज माझ्या पोटोबाची,
भूक काहो भागत नाही.. 
चिंबोरी च्या कालवणाचा,
रंग कसा लाल बाई..
     
तुरु तुरु धावे राणी,
पळण्याची तिला घाई..         
हिला हाती धरण्यासाठी,
कोणी तिच्या पाठी जाई...
हात कोणी जरी हो लावी...हो...हो...हो...
हात कोणी जरी हो लावी,
बोटे त्यांची फोडून खाई ...
आज माझ्या पोटोबाची,
भूक काहो भागत नाही...
चिंबोरी च्या कालवणाचा,
रंग कसा लाल बाई...    
      
हात पाय मोडुनी बाई,
मसाल्यात उडी घेई...
रागे लाल लाल होई,
चव तिची उठुनी येई...
नीट खा हो या राणीला...हो...हो...हो...  
नीट खा हो या राणीला,
नाकी डोळी पाणी येई...
आज माझ्या पोटोबाची,
भूक काहो भागत नाही ...
चिंबोरी च्या कालवणाचा,
रंग कसा लाल बाई... 
   
वाटी पोहते रश्यात,
नांग्ड्यात बर्फी होई...  
हिची चव घेण्यासाठी,
झाली मला भलती घाई...
नीट बघून घे ग ताई...हो...हो...हो...       
नीट बघून घे ग ताई,
नर मादी ओळख देई...
आज माझ्या पोटोबाची,
भूक काहो भागत नाही...
चिंबोरी च्या कालवणाचा,
रंग कसा लाल बाई..
                                  सौ.प्रज्ञा प्रधान ..