" नेता तो आला आला ..!"
नेता तो आला आला मला भेटण्याला ||धृ||
मला भेटण्याला आला मते मागण्याला |नेता .!
"पुष्पहार घालून गळा ,फिरे पहा गल्ली बोळा"2 |
" पाचवर्षे नाही दिसला ,चुकोनिया एक वेळा"2 ||
" देऊनिया आश्वासने ,नाही शब्द तो पाळला" |
" वचनांची धूळफेक२, "कळली सारी जनतेला||१||धृ||
" सत्ता होती त्याचे हाती ,लुटली त्याने सारी खाती|"2
" गुंडाना धरुनी हाती ,ठेवी धाक जनतेवरती"२
" आदर्शाची त्याच्या ख्याती सर्वश्रुत सर्वांभूती"२
" सोडोनिया धर्म नीती,"२नित्य करी घोटाळ्याला ||२ ||धृ||
अनंत खोंडे
२५|१|२०१४.