बेरड

  जन्म मरणाचे मोल संपले

  यंत्रवत ते शिल्लक राहिले
  पुढचे पाठ होत गेले
  मागचे नेहमी सपाट झाले
  तरी मी पाप करितो
  निर्लज्जपणे ......
  पुण्याची व्याख्या बदलत जातो
  क्षणोक्षणी माझी सोय पाहत राहतो
कबुतरांना दाणे घालतो 
मुंग्यांना साखर देतो
गरजूंना डावलून 
खोटी श्रीमंती अंगावर घेतो
सत्कार माझे मला आवडतात 
टाळ्यांसाठी खोटे वागतो
खोटे हसणे खोटे दिसणे
अंगवळणी पडले आता
देह मातीत मिसळला 
आत्मा ज्योतीत मिळाला 
भेदाभेद नष्ट झाला
कसली मुक्ती अन कसला मोक्ष ?
पुढे काही जाणार नाही 
मागचे काही आणले नाही 
म्हणून तर मी बिंधास्त्पणे
बेरड बनतो मुक्तपणे 
...