मला एकटक निरखत होती.....

गझल
वृत्त: समजाती-अष्टावर्तनी-पादाकुलक-मात्रावृत्त
मात्रा: ८+८=१६ मात्रा
******************************************************

मला एकटक निरखत होती.....
हृदयी धडधड वाढत होती!

अहोरात्र झगमगाट होता.....
स्वप्ने सारी जागत होती!

पळभर झाला स्पर्श स्मृतींचा....
कळ जन्माची ठणकत होती!

खेळ मनाचे चालू होते....
विषण्णता मन ग्रासत होती!

गझल भटांची वाचत निजलो....
ओळ ओळ मज व्यापत होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१