बाबा मी पण त्यांना मत दिले होते

बाबा मी पण त्यांना मत दिले होते
बाबा मी पण त्यांना मत दिले होते

घोटाळ्यांची रांग, महागाई चा भडका
त्यावर लागलाय बेकारी चा तडका
बघितले होते किती स्वप्न, झाले सगळे खोटे
बाबा मी पण त्यांना मत दिले होते

कधी मंदी ची भीती, कधी भाव वाढी चा त्रास
पदभ्रष्टांनी काढून घेतलाय तोंडातला ही घास
पेट्रोल आणि गॅस सोडा, होतात पाण्याचे ही तोटे
बाबा मी पण त्यांना मत दिले होते

रोज नवीन मनस्ताप, रोज आत्महत्या
कुठे विद्ये चा बाजार, कुठे गरिबी ची समस्या
तरी हे पापी घालून फिरतात माणुसकी छे मुखवटे
बाबा मी पण त्यांना मत दिले होते

वोट न करणारे षंढ ह्यांच्या जिंकण्याचे कारण ठरले
त्यांनी ही आमच्या बरोबर ह्या चुकीचे दंड भरले
आता तरी डोले उघडा अजून किती खाणार गोते
बाबा मी पण त्यांना मत दिले होते