रजनी
क्षितीज लाल पिवळं ,धूसर,काळसर
हळूहळू उतरला घरा परतला रीतसर
दिसता रजनीचा हा काळाभोर केशसंभार
त्या आड विसावला शांत-क्लांत दिनकर
शांतता भंग न व्हावी ,झाले स्तब्ध तरुवर
वर वेलीच्या मादकतेस आला बहर
कहर झाला, पसरला चोहीकडे अंधार
कडक पहारा देण्या निशाचर तत्पर
क्वचित उलुक ' जागते राहो 'चा करी गजर
चमकला काजवा, स्रृष्टीस सुचवी विचार
सुविचारी रविराजास उठवा आता सत्वर
त्वरा करा, दिन करा, झाली उषा ......
विजया केळकर ____