हा रिमझिम झरता

हा रिमझिम झरता श्रावण होतो भास तुझा
हा मातीचा गंध की दरवळला श्वास तुझा......

बहर फुलांचा येता भरते नभ गंधाने
हृदयी आठवणींचा दाटून सुवास तुझा......

ती उन्हात कुणा आधार तरूची छाया
भासत होता तैसा मज हा सहवास तुझा......

तू आता मज म्हण अपुला या झिडकार मला
राहीन बनूनी जन्मभरी मी दास तुझा......