बासरीचे गुपित

नित्य हरिचे अधरामृत
सेवन तू करीशी
भाग्यवंत तू बासरी
अभागी राधा मी बावरी
काय तप केले?
कोण पुण्य संपादिले?
मज सांगी तू बासरी
विनवी राधा मी बावरी
अहं भुसा टाकूनी
पोकळ जहाले
ऐक राधे गे साजणी
गुपित सांगतसे बासरी 
- देवदत्त परुळेकर मो.क्र. ०९४२२०५५२२१