जलाशय जलाशय

जलाशय जलाशय

जलाशय जलाशय,
मदिरालय मदिरालय फिरुनहि
न भागलेली युगायुगांची तहान घेऊन...
आलो तुझ्या काठावर
तेंव्हा पाहिलं तुला
..स्वतःच्याच तहानेनं दुथडी भरुन वाहतांना...
आणि मग ओ़ंजळभरुन प्यायलो
तुझी तहान !
आणि झालो क्षणार्धात
शांत....तृप्त!
आता यापुढे माझ्या तहानेला 
तुझ्या तहानेच्या जलाशयाशिवाय
गत्यंतर नाही.....

------------------------- जयन्ता५२