"सांग किती तू खावे "
सांग किती तू खावे ||धृ||
खाता पोट सुटावे ||
लांडीलबाडी ही वरचेवर |
करुनी आला तू सत्तेवर||
भ्रष्ट धन जमवावे||धृ||१||
लाल दिव्याची सदैव मोटर |
दिमतीलाही नोकर चाकर ||
गुलाम त्यांनी राहवे||धृ||२||
निवडणुकीचा होता जागर |
मते मागण्या येशी सत्वर||
निवडून का तुज द्यावे||धृ||३||
अनंत खोंडे
१४।३।२०१३.