तोच तो, तोच तो ....
गोर्रा गोर्रा पान कस्सा
मामा आम्चा छान तो
पुर्री सार्खा गोल गोल
मामा आम्चा गोड तो
मोठा मोठा होता होता
होतो ल्हान तोच तो
उंच उंच आभाळात
फिर्तो एकटाच तो
कडेवरुन आईच्या
बघतो मी रोज तो
कधी करतो बुवा कुक्
होतो पार गुलऽ तो
करंजीतून हस्तो कस्सा
कित्ती क्यूटी मामा तो
ढग्गांशी लप्पाछप्पी
खेळतो गंमतीदार तो
निंबोणीच्या झाडामागून
अज्जूनही डोकावतो .... 