आठवाया लागले विसरून जाणे

रोजचे मज पाहुनी हासून जाणे 

अन तुझ्या ओठात मी हरवून जाणे 

फोन तू करणार नाही बोलल्यावर 
तेच पुन्हा फोनवर बोलून 
जाणे 

मी तुला विसरून गेलो काल जेंव्हा
आठवाया लागले विसरून जाणे

नेहमी मुठ्ठीत मी धरणे सुखाला
नेहमी त्याचे तसे निसटून जाणे

वागणे माझे असे मी ठेवलेले
आत मी रडलो तरी हसवून 
जाणे 

या पुढे न भेटणे हे सांगण्याला 
रोजचे माझे तुझे भेटून 
जाणे