स्वातंत्र्य दिनी जर पंतप्रधानानी असे भाषण दिले तर

            खरेतर आपण सर्वांनी  मिळून देशाला विकासाकडे नेत आहोत परंतु अद्यापही आपण विकासात मागेच आहो तेव्हा आपला सर्वांचा सहभाग हा या कामी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले तेव्हा आपण एक म्हणजे ज्या सुट्या घेतो त्या ऐवजी पगारी रजेत वाढवून घेऊ म्हणजे ज्याला त्या सणाला घरी राहायला नको असेल तो कामावर येईल व जर रजा राहिला तरी पगाराचे नुकसान व्हायचे नाही या दृष्टीने झाला तर फायदाच होईल.                आपल्या देशाला विकसित करण्यासाठी त्याचा फायदाच व्हावा असे वाटते. त्यामुळे आपली बँक वगैरे सरकारी कामे पण लवकर व्हावीत. थोडक्यात बोलायचे झाले तर स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन सोडल्यास सर्व सुट्या या काही सणा निमित्त दिल्या जातात ते सण सर्वाचेच नसतात ज्यांना त्या दिवशी सणाचे म्हणून घरी राहायला हवे असेल ते सुटी घेऊ शकतील