राजा रवि वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहतांचा रंग रसिया...

सात नोव्हेंबर ला "रंग रसिया" रिलीज होत आहे. 
मित्रांनो, रणजित देसाईंचे राजा रवी वर्मा पुस्तक वाचलेत का? पूर्ण भारतात "राजा रवि वर्मा" च्या जीवनावरचे ते एकमेव आणि मराठी पुस्तक आहे. त्याचे नंतर इंग्रजीत भाषांतर झालेले आहे. आगामी हिंदी चित्रपट "रंग रसिया" त्यावरच आधारित अाहे. रणदिप हूडा आणि नंदना सेन हे त्यातले कलाकार आहेत. एखाद्या चित्रकाराच्या जीवनावर ची ही प्रथम आणि एकमेव कादंबरी आहे. रवी वर्मा आणि त्याचे जीवन खूप वादग्रस्त होते. त्याचे मामा राज वर्मा याने त्याच्यातला कलाकार लहानपणापासून ओळखला. त्या वेळचा इतिहासाचा कालखंड आणि एकूणच त्यावेळची मातृसत्ताक पद्धती आपल्याला आश्चर्यचकित करते. मी मराठीत ही कादंबरी पूर्वी वाचलेली आहे. वाचनाची आणि चित्रकलेची आवड असणार्‍या सर्वांना सुचवू इच्छितो की आपणही ही कादंबरी जरूर वाचा.
येथे आपण खाली दिलेल्या सगळ्या बाबतीत चर्चा करूया:
राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...