-मन कितीतरी देशात , भावनेत ,कल्पनेत , असल्या -नसल्या… सगळ्याच गोष्टीच जाऊन अडकत ……
कधीतरी खऱ्या प्रश्नांची उत्तरंहि घेऊन परत हि येत , तर कधी न सोडविणारी कोडी घेऊनही समाधान भावनेन परत येतांना सुखद यातानेन हि भारावत…
न आवडणारे क्षण आठवून काहीतरी त्यातूनही शिकवून जांत तर पुन्हा -पुन्हा आठवून देऊन ,खोडचुका हि पकडून लक्षांत आणूनही बरोबरीचे अर्थ जुळवून नेत …।
गोड-तिखट भावनेची चव जिभेवर रेगांळावी म्हणून रोजच जगलेले क्षण पुन्हा पुन्हा आवडणारे किंवा नवडणारे ,पकवानांना वेगळ्याच रीतीने थापायला लावंत हे मन …
क्षणापेक्षाही कमी वेळ न लावता सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या रीतीने,,, वेगवेगळ्या नजरेने बघायला प्रवृत्त करत ते हेच मन …।
तर कधी नदीच्या प्रवाहाप्रमाणे संथ , नितळ ,शुभ्रं आणि हो!!!सगळ्याची तहान भागविता यावी अश्या आपल्या गुणधर्माला जपून तृप्तता मिळवून दयावी असले विचार करायला लावणारे हे मन…
मात्र कशी सावरू या मनाला ?
कशी युक्त्या खेळवून समाधानाची तहान भागवून तृप्त करू या मनाला?
कुठली समीकरणे , कुठल्या नियमाने सोडवू या मनाला ?
कुठल्या देशात जाऊन परत आणू या मनाला ?
सुखाच्या ,, दुःखाच्या ,,कि रागाच्या ,कि ,,शांततेच्या भावनांना जन्म देवून ,,,
मरणाच्या दारावर जावून परत आणू या मनाला ???
स्वतःच्या कल्पनेने सुंदर स्वप्नांचे पंख लावून उडवू सात -समुद्राच्या आणि ब्रम्हांडांच्या गोल दुनेयेत या मनाला …. ??
कि खिन्न खंत असलेल्या आणि सहनशीलता धारण करून आगळ्या -वेगळ्या रूपाने पुह्ना -पुन्हा ,,, रोज -रोज ,,,क्षणो -क्षण
जन्म देवून रोजच मरण घडवून आणू का या आणि याच मनाला????
श्वेता मेश्राम
१४/०३/१४
१:०९ शुक्र …