निवृत्तीआधी दूरचित्रवाणीवर मतप्रदर्शन

   सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यावर त्याविषयी सल्लागार कंपनी स्थापन करणे, मार्गदर्शन करणे वा तत्सम त्रयस्थ भूमिका घेतली जाण्याची परंपरा आपल्याकडे आहे. कपिलदेव, गावसकर, वसिम अक्रम यांनी निवृत्तीनंतर क्रिकेटचे समालोचक म्हणून कामगिरी बजावलेली आहे.
पूर्ण क्षेत्र गाजवून झाल्यावरच त्याबाबत समीक्षा करण्याचा संकेत आहे, असावा. गेल्या पाच वर्षांमधे असे दिसून आले आहे की, ज्यांनी अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर केलेली नाही, जे संघातून तात्पुरते बाजूला आहेत त्यांना दूरचित्रवाणीवर बोलावून सामन्याबाबत मते व्यक्त करायला सांगितले जाते. हे समालोचन नाही, अधून मधून मतप्रदर्शन आहे पण निवृत्तीआधीच असे करणे म्हणजे एका अर्थी संघाशी संबंधित राहून त्रयस्थ व्यक्तीशी संघातील गुणदोषांची चर्चा करण्यासारखे आहे. 

उदाहरणे - मुरली कार्तिक, रुद्रप्रतापसिंग.

माझ्या माहितीप्रमाणे, वरील खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केलेली नाही. माझी माहिती चुकीची असल्यास दुरुस्ती करावी.

१. या खेळाडूंची अघोषित निवृत्ती आहे का? कारकीर्द संपल्यात जमा आहे का?
२. निवृत्ती जाहीर केली नसली आणि संघात पुन्हा परतायच्या संधी असल्या तरीही समालोचन करता येते, मत व्यक्त करता येते - असा नवीन पायंडा पडलेला आहे का ?