माझे काय चुकले ?

माझे काय चुकले ?

एक शिंतोडा उडाला
पडला माझ्या चारित्र्यावर
धू धू धुतला पण
गेला नाही आजवर

एवढेच पाप मी केले
तुझ्यावर प्रेम केले
अव्हेरून त्यास तू
मज कलंकित केले

नाही धुतले जाणार
आता पश्चात्तापाच्या अश्रूने
एवढेच सांग मला
माझे काय चुकले ?

राजेंद्र देवी