मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

नमस्कार मराठी मित्रांनो,
गेल्या चार पाच वर्षांपासून 'मनोगत' ची नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मनोगत' चा आवाका खूपच प्रचंड आहे. कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच  खूप उपयोगी पडते.
तुम्हाला सर्वांना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या पोस्ट चा खटाटोप..  आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करून UK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी  खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा!
चांगले मराठी सिनेमा पाहण्याची ओढ आणि त्या साठी पाहावी लागणारी वर्षभराची वाट, छोटी स्क्रीन व  pirated कॉपी चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला पुरेशी ठरली, आणि सुरू झाली तयारी..  
बजेट, कॉन्टॅक्ट्स, मार्केटिंग, थिएटर्स, प्रॉडक्शन  हाउसेस, मराठी कम्युनिटी अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "Half Ticket"  काढलं. म्हणजे....
मराठी पॉपकॉर्न  हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening
येत्या  २१ ऑगस्ट २०१६ ला UK  मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये हाफ टिकीट सादर होतोय.  
आमच्या कडून आम्ही सगळ्यांना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्या उपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बरेच मराठी सेलिब्रिटीज सुद्धा पुढे आले आहेत..
 
आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची!
 
आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता.  
तुम्ही "हाफ टिकीट" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पेज वर!
तुमच्या UK मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमा आवर्जून बघायला  सांगा , त्यांना पण सांगा ना मराठी पॉपकॉर्न बद्दल!
 
आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता UK मध्ये तो हि मोठ्या स्क्रीन वर घेऊयात... येताय ना मग "हाफ टिकीट" बघायला फुल्ल तिकीट काढून..  
 
तुम्ही खालील लिंक्स वरून आमच्याशी संपर्क साधू शकता, लाइक करा, शेअर करा,  प्रेमाने सपोर्ट करा.  

मराठी पॉपकॉर्न