श्रीकृष्णमुरारी

वसू-जानकीचा पुत्र । जन्म अष्टमीची रात्र ।।
वसुदेव नेई मथुरी । त्या कृष्णमुरारी ।।

श्रावण अष्टमीची रात्र । यमुनेच भरलं पात्र ।।
पाय लावून पूर ओसरी । तो कृष्णमुरारी ।।

यशोदेचा कान्हा । नंदाचा लाला ।।
लेक होऊन उद्धरी । तो कृष्णमुरारी ।।

वाट दे गं यमुनाई । तुला विनवी सत्यभामाई ।।
जर बालब्रम्हचारी । तो कृष्णमुरारी ।।

सांगे अर्जुनाला गीता । झाला द्रौपदीचा भ्राता ।।
तिची अब्रू रक्षिली ।   तो कृष्णमुरारी ।।

ब्रम्ह देव निर्माता । नेई महादेव अंता ।।
मधे जगपालन करी ।  तो कृष्णमुरारी ।।

येऊ घातले रामराज्य । सनातन धर्म राज्य ।।
नाम जपा घरोघरी ।   श्रीकृष्णमुरारी ।। 

राहुल रमेश जाधव
मारुंजी, पुणे-५७
९८२२९४०४५१