लोकसत्ता - ‘लोकरंग’ (२१ ऑगस्ट) मधील वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेल्या ‘मराठीने नुक्ता स्वीकारावा का?’ या लेखावरील अरूण फडके व प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील.
माझ्यासाठी मनोगत ही वेबसाईट प्रमाण आहे. यातील टंकलेखन साहाय्य या टाईपरायटर चिन्हावर टिचकी मारली असता जो तक्ता येतो, त्यात ज ( j ) आणि ज़ ( z ) असे स्पष्टपणे वेगवेगळे दाखविलेले आहेत. आधुनिक संगणकाने तर त्याचा कधीच स्वीकार केला आहे.
आपण मराठी माणसे "वाटीतला चमचा" आणि "पुढार्याचा चमचा" यातील उच्चारात फरक करतोच. पण तो सवयीने आणि संदर्भाने. संगणक युगात "text to speech" हे तंत्रन्यान झपाट्याने विकसित होत आहे. पुढार्याच्या चमच्याचा उच्चार वाटीतल्या चमच्या सारखा केला तर खर्या चमच्याचा अपमान होईल. तेव्हा संगणकाला या दोन उच्चारातील फरक नुक्त्यानेच दाखवून द्यावा लागेल.
_____
युनिकोडने खाली दिलेल्या सर्व नुक्ताधारी अक्षरांचा मुळाक्षर म्हणून स्वीकार करून त्यांना स्वतंत्र नंबर दिला आहे.
र न ळ क ख ग ज ड ढ फ य
पण त्यात च आणि झ चा समावेश नाही. त्यासाठी च ला नुक्ता जोडावा लागेल आपण इकार, उकार जोडतो तसे.
युनिकोडने नुक्ताधारी च / झ चा देखील स्वतंत्रपणे स्वीकार करावा असे मला वाटते.
युनिकोडने नुक्ताधारी च / झ चा देखील स्वतंत्रपणे स्वीकार करावा असे मला वाटते.