अपंगत्व प्रमाणपत्र

प्रिय मनोगती,
मला माझ्या ९ वर्षाच्या मुलीसाठी , जी सेरेब्रल पाल्सी (स्नायुताठरतेमुळे येणारी बहु-विकलांगता, जिचे मूळ कारण मेंदूतील बिघाड हे असते))ने त्रस्त आहे, अपंगत्व प्रमाणपत्र मिळवावयाचे आहे. मला फक्त हे माहीत आहे की ते सिव्हिल सर्जन कडून मिळते आणि ते निःशुल्क मिळते.
पण त्यासाठी नेमकी काय प्रोसिजर आहे हे कुणी मला इथे विषद करून सांगेल का?
म्हणजे, कागदपत्रे कोण-कोणती लागतात, ती कुणा-कुणाकडून मिळवावी लागतात. सत्यांकित केलेलीच असली पाहिजेत का?
ही कागदपत्रे कार्यालयात देताना तेथील अधिकारी नेमकी काय प्रोसिजर करतात. कोणकोणत्या चाचण्या कराव्या लागतात.
आणि ही सगळी माहिती देणारी कुठली एखादी वेबसाईट आहे का?

कृपया माहिती यावी ही अपेक्षा.............

आपला,

कृष्णकुमार द. जोशी