मराठीतून मलयाळम

माननीय मनोगती,
सध्या मी मलयाळम (भाषा आणि लिपीसुद्धा) शिकण्याची खटपट करीत आहे. लिपी थोडी थोडी जमत आहे.
ह्यासाठी जर मला "मराठीतून मलयाळम शिका" असे एखादे पुस्तक मिळाले तर मदत होईल. "नितीन प्रकाशन" तर्फे
अश्या पुस्तकांची मालिका बाजारात उपलब्ध आहे पण तीत "मलयाळम शिका" हे पुस्तक नाही. (माझ्या अंदाजानुसार त्यांनी
ते काढलेलेच नाही. चूकभूल द्यावी घ्यावी.)
असे पुस्तक कुणा मनोगतीस माहीत असल्यास मला त्याच्या उपलब्धतेबद्दल कळवलेस मी उपकृत होईन.
माझा विपत्ता येणेप्रमाणेः
kedeejoshi@gmail.com

आगाऊ धन्यवाद....

आपला,
कृष्णकुमार द. जोशी