भुक माझी एका भाकरीची उगा खजीने शोधावे कशाला

कधी वाटते जगावे कशाला
गीतच प्रेमाचे गावे कशाला
असे अंतरी तूझाच मृदगंध 
जगी कस्तूरी शोधावे कशाला
जरी तू मला पुकारी गबाळा
तूझ्यासारखे दिसावे कशाला
भुक माझी एका भाकरीची
उगा खजीने शोधावे कशाला
धुंद दिसतो पहाता आकाशी 
फुका तो ध्रुव बनावे कशाला
दुख दिसते नजरेत शोधता
उगा शब्दात मांडावे कशाला
काय राहते युद्धाच्या शेवटी
ऊगाच आपण लढावे कशाला
आहे घेतली आता लेखणी हातात  
उत्तर खड्गाने शोधावे कशाला
आहे कष्टाची माझी झोपडी सुंदर
दुःख राजमहालाचे असावे कशाला