.........पापनिष्ठ ?

देव पाप्यांशी धार्जिणा 

जैसी गाय कसाबाशी 
पुण्यवान कष्टती जगी
दर्शन भासेही न पावती 
रावणे राम पाहिला 
शिशुपाले कृष्ण जैसा 
कंस तो भाग्यवान 
कालिया सहजी उद्धरला 
संभ्रमात साधुजन 
व्हावे पुण्यनिष्ठ की पापनिष्ठ ?
भेटे देव तामसियांशी सहजी 
सर्वाआधी 
सामान्य्जन तीर्थाशी जाती 
लक्ष्मीचा अपव्यय करिती 
संसार व्यवहारी कष्टती 
अकारण जन्मोजन्मी 
गंगाधरसुत म्हणे 
प्राधान्य तिमिराशी जगी 
मैत्री वाढवावी घट्ट तयाशी 
सुखी व्हावे.